दि.०७ फेब्रुवारी २०२० रोजी झील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड रिसर्च महाविद्यालयातील ७१४ विविध शाखेतील(कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन, आय.टी., मेकॅनिकल, सिव्हिल) विध्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले.
पदवी प्रदान समारंभास डॉ.बी.बी.काळे संचालक, सेन्टर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेकनॉलॉजि, पुणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व विद्यापीठ गीताने झाली. प्राचार्य डॉ. अजित काटे यांनी उपस्थित सर्वप्रमुख पाहुणे यांचे स्वागत करून महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. डॉ.बी. बी. काळे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभियंत्यांनी नोकरी करण्यापेक्षा उद्योजक होवून नोकऱ्या निर्माण कराव्यात असे मत मांडले. यावेळी त्यांनी बोलताना सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे सचिव श्री जयेश काटकर यांनी विध्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्या दिल्या. सदर कार्यक्रमाचे संयोजन कॉलेज परीक्षा अधिकारी प्रा.मनोज हंस, विद्यार्थी मंडळाचे समन्वयक प्रा. आकाश सूर्यवंशी तसेच क्रीडा समन्वयक प्रा.प्रमोद मागाडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चिन्मय देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदान आणि राष्ट्रगीताने झाली.