तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने क्रांतीज्योती भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश किसान संघाचे अध्यक्ष गणेश भेगडे, तालुका भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, माजी नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, ऍड. रवींद्र दाभाडे, मुख्याधिकारी एन.के. पाटील, उपमुख्याधिकारी ममता राठोड, तळेगाव शहर भाजपचे अध्यक्ष अशोक दाभाडे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, संतोष दाभाडे पाटील, शोभा भेगडे, विभावरी दाभाडे, रजनी ठाकूर नगर परिषदेचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे व तळेगाव शहर महिला रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षा करुणा सरोदे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय कार्याची माहिती सांगितली. उपस्थित सर्वांनी प्रतिमेस अभिवादन केले. सूत्रसंचालन भास्कर वाघमारे यांनी केले.