सातारा – सातारा जि. प. आर्थिक सहकारी सहाय पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ. प्रशांत भोईटे व व्हा. चेअरमनपदी अविनाश कवळे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा परिषद आर्थिक सहाय्य पतसंस्थेचे मासिक सर्वसधारण सभा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासो भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी संस्थेच्या चेअरमनपदी डॉ. प्रशांत भोईटे व व्हा. चेअरमनपदी अविनाश कवळे यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी मार्गदर्शक संचालक व सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक सागर साळुंखे, माजी चेअरमन सुनिल कापसे, माजी व्हा. चेअरमन सुनील भोसले, संचालक श्रीरंग गोडसे, किरण पाटणे, प्रशांत साळुंखे, संग्रामसिंह साळुंखे, प्रशांत पवार, राकेश जाधव, अरूण गुरव, तुकाराम खाडे, सौ. हेमलता कुलकर्णी, सौ. राखी घोरपडे, तज्ञ संचालक माधव गंगावणे, अविनाश खुडे,
संजय बर्गे, प्रशांत कांबळे, तसेच जि.प.लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष मारुती जाधव, सरचिटणीस दिनकर चव्हाण, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र संकपाळ, लेखा संघटना अध्यक्ष राजू माने, सुनील खामकर, अमोल पवार, चतुर्थश्रेणी कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र चांदेकर, व्हा. चेअरमन विनोद ननावरे, पशुचिकित्सा संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद घोरपडे, आरोग्य संघटनेचे अध्यक्ष तुषार निकम, विठठल ओंबळे, चतुर्थश्रेणी पतसंस्थेचे माजी चेअरमन महेश गुरव, माजी संचालक राजेंद्र केळुसकर, महेश साळुंखे, विनोद शेळके, किसन जडे, अजित गायकवाड, जि.प.कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन यांनी सर्व संचालकांना सोबत घेवून सर्वसमावेशक कामकाज करण्याचे आश्वासन दिले. संस्थेचा कारभार करीत असताना सभादांच्या हिताचा विचार करून निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. निवडीबद्दल नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.