पोस्टाच्या बॅंकेची लॉकडाऊनमध्ये उत्तम कामगिरी

नवी दिल्ली – पोस्ट पेमेंट बॅंकेने लॉकडाऊनच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये 21 लाख व्यवहाराद्वारा 408 कोटी रुपयांचा व्यवहार केला असल्याचे निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले.

मुळात ग्रामीण भागांमध्ये जनतेला बॅंकिंग सुविधा घरपोच मिळाव्या यासाठी केंद्र सरकारने दीर्घ पल्ल्याचा विचार करून पोस्ट पेमेंट बॅंक सुरू केली होती. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून पेमेंट बॅंकेचे ग्रामीण भागातील जाळे मजबूत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील जनतेला वित्तीय सुविधा मिळाल्या तरच त्यांना गरिबीतून लवकर बाहेर पडता येईल असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.