मोठा अनर्थ टळला! पुणे-नाशिक महामार्गावर चालू खासगी बसला आग; बस जाळून खाक

राजगुरूनगर (रामचंद्र सोनवणे) : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरुनगर जवळील खरपुडी फाटा येथे आजपहाटे धुळे येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या चालु लक्झरी बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले मात्र लक्झरी बस आगीत जळुन खाक झाक झाली आहे.

धुळे वरुन पुण्याच्या दिशेने 50 प्रवाशी घेऊन खाजगी बस जात होती. राजगुरूनगर जवळील खरपुडी फाट्याजवळ आल्यानंतर बसच्या मागील टायरला अचानक आग लागली. काहीच वेळात आगीचा तीव्रता वाढली. अर्ध्यातासात संपुर्ण बस आगीच्या भस्मस्थानी झाली. राजगुरुनगर नगरपरिषदेची आग्निशामकदलाची गाडी घटनास्थळी पोहचली मात्र संपूर्ण गाडी जळून खाक झाली होती. सुदैवाने गाडीतील ५० प्रवाशी सुखरूप आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.