बारामती (प्रतिनिधी)- शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास व औद्योगिक विकास मंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्रातील युवा वर्गासाठी 80 हजार रोजगारांची संधी उपलब्ध करून देत आहेत. महाराष्ट्रातील युवकांनी दि. 7 ते 12 डिसेंबर या कालावधीमध्ये पुढील लिंकवर https://yodhaat80.org/ नोंदणी करावी, असे आवाहन राष्ट्रवादी कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे पक्षनिरीक्षक, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष, अहमदनगर युवकचे जिल्हा प्रभारी किशोर आप्पासाहेब मासाळ यांनी केले.
करोना आणि लॉकडाऊनच्या काळात राज्यातील लाखो युवकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. त्या तरुणांना दिलासा देण्यासाठी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगार आणि सुशिक्षित वर्गासाठी अनोखी संधी तयार केली आहे. या संधीचा लाभ तरूणांनी घ्यावा.
– किशोर मासाळ, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस.
मासाळ म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत. वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी व्यापक प्रयत्न करीत आहेत. सध्या करोनाच्या काळामध्ये आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यासाठी राज्याचे कौशल्य विकास व औद्योगिक विकास मंत्री नवाब मलिक यांनी हा उपक्रम राबविला आहे.