अहमदनगर : ग्रामदैवत विशाल गणपती विसर्जन मिरवणुकीस रामचंद्र खुंट येथून सुरुवात झाली आहे. दरम्यान, या मिरवणूकीनंतर इतर गणेश मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
मागील वर्षी डिजेला बंदी घातल्यामुळे प्रमुख मंडळांनी मुख्य मिरवणुकीवर बहिष्कार टाकला होता.
त्यामुळे यावर्षीदेखील मागील वर्षीप्रमाणे केवळ 10 ते 12 प्रमुख मंडळे या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.