एके 47 रायफल्सचा शस्त्रसाठा पकडला

पठाणकोट : पंजाबमधून काश्‍मिरात एके 47 घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी जप्त केला. यावेळी तीन दहशतवाद्यांना अटक करून त्यांच्याकडून सहा एके 47 रायफल जप्त करण्यात आल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जम्मू पठाणकोट मार्गावर सुरू असणाऱ्या नियमित तपासणीत एका ट्रकमध्ये सहा एके 47 रायफल्स जप्त करण्यात आल्या. हा ट्रक पठाणकोट (पंजाब) येथून श्रीनगरकडे जात होता. तपासणी नाक्‍यावर त्यातील शस्त्रसाठा आढळून आला. यातील तीघांची कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)