#photogallery# घरच्या बाप्पाचे विसर्जन अनंत दर्शन रथामध्येच…

अहमदनगर (प्रतिनिधी) : आज सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणूक मोठा उत्साहात संपन्न होत आहे. शहरासह सावेडी उपनगरात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणूकांना सुरवात झाली आहे.सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन वाजता गाजत निघतात. मात्र, घरगुती गणपती बाप्पाची मिरवणूक वाजत गाजत काढण्यासाठी सावेडी येथील श्री. तालयोगी प्रतिष्ठान घरच्या बाप्पाचे विसर्जन ‘अनंत दर्शन’ मध्ये तालयोगीच्या गजरात वाजत गाजत करणार आहे.

शाडू माती पासून बनवलेल्या गणेश मूर्तीचे या रथातच विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी श्री. तालयोगी प्रतिष्ठानने मोठा रथ सजवला आहे. सावेडी उपनगरातील घरगुती गणपती या रथामध्ये ढोल-ताशांच्या गजरात व वारकरी वाद्यांमध्ये आज सायंकाळी पाच वाजता प्रोफेसर चौक ते यशोदानगर अशी विसर्जन मिरवणूक निघणार आहे. यावेळी आदर्श गाव हिवरे बाजार चे सरपंच पोपटराव पवार, उद्योजक नरेंद्र फिरोदिया आदी मान्यवर उपस्थित असणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×