नगर – नगर जिल्ह्यात आज 765 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 83 हजार 504 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 93.23 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात रुग्णसंख्येत 654 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 4 हजार 871 इतकी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजअखेर तब्बल 89 हजार 567 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 94, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 380 आणि अँटिजेन चाचणीत 180 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 63, नगर ग्रामीण 6, पारनेर 1, पाथर्डी 2, राहाता 1, राहुरी 3, संगमनेर 4, शेवगाव 3, श्रीरामपूर 10, कॅन्टोन्मेंट बोर्ड 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 140, अकोले 11, जामखेड 4, कर्जत 2, कोपरगाव 53, नगर ग्रामीण 10, नेवासे 2, पारनेर 12, पाथर्डी 2, राहाता 39, राहुरी 4, संगमनेर 47, शेवगाव 3, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 38 आणि इतर जिल्हा 12, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 180 जण बाधित आढळून आले. मनपा 22, अकोले 7, जामखेड 14, कर्जत 1, नगर ग्रामीण 17, नेवासे 12, पारनेर 25, पाथर्डी 13, राहाता 10, राहुरी 8, संगमनेर 8, शेवगाव 15, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 7, कॅन्टोन्मेंट 5 आणि इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 250, अकोले 10, जामखेड 28, कर्जत 5, कोपरगाव 55, नगर ग्रामीण 31, नेवासे 25, पारनेर 36, पाथर्डी 33, राहाता 94, राहुरी 11, संगमनेर 71, शेवगाव 14, श्रीगोंदा 34, श्रीरामपूर 43, कॅन्टोन्मेंट 2 आणि इतर जिल्हा 23, अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्णसंख्या : 83504
उपचार सुरू असलेले रुग्ण : 4871
मृत्यू : 1192
एकूण रुग्णसंख्या : 89567