जामखेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील खर्डा, साकत ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने झेंडा फडकावला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला दे धक्का दिला.
साकतमध्ये राष्ट्रवादी ५, भाजप ४ व दोन अपक्ष असे बलाबल आहे. आणि दोन बिनविरोध आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ ७ झाले आहे. पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांचे दहा वर्षांपासून असलेली सत्तापालट झाली आहे.
साकत पाठोपाठ खर्डा राष्ट्रवादी काँग्रेसने दुसर्या मोठ्या ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर करून विजय मिळविला आहे. येथे राष्ट्रवादीचे ११ तर भाजपचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत.