जरा हटके ! शपथ घेण्यासाठी सरपंचाची थेट हेलिकाॅप्टरमधून ‘एन्ट्री’; गावात दिवाळीसारखा जल्लोष

अहमदनगर – संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात एक आगळावेगळा शपथविधी सोहळा पाहायला मिळाला आहे. सरपंचपदाची शपथ घेण्यासाठी सरपंचाने थेट हेलिकाॅप्टरमधून एन्ट्री केली. सरपंचाचे आगमन होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच बारा बैलांच्या बैलगाडीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

हेलिकॉप्टरने एन्ट्री करत सरपंचाने शपथ घेतली, संगमनेरच्या आंबी दुमाला गावात दिवाळीसारखा जल्लोष

मुख्यमंत्र्याच्या शपथविधीसारखाच दैदिप्यमान सोहळ्यात सरपंचाचा शपथविधी पार पडला आहे. जालिंदर गागरे असे सरपंचाचे नाव आहे.

हेलिकॉप्टरने एन्ट्री करत सरपंचाने शपथ घेतली, संगमनेरच्या आंबी दुमाला गावात दिवाळीसारखा जल्लोष

जालिंदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. गावाकडील शेकडो तरूणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ते जरी व्यावसायानिमित्त पुण्यात राहत असले तरी त्यांची गावाशी नाळ जोडलेली आहे.

गावाचा विकास करण्यासाठी त्यांनी गावची निवडणुक लढवली आणि संपूर्ण पॅनल 9 पैकी 9 जागा जिंकून ते बहुमताने विजयी झाले. योगायोगाने सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरूषाचे निघाल्याने ते संरपंचप झाले. मंत्री, मुख्यमंत्र्यांप्रमाणेच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि उपसंरपंच यांनी आज गावच्या विकासाची शपथ घेतली. हा सोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी गागरे चक्क हेलिकाॅप्टरने आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.