रेडा – पुणे जिल्हा वार्षिक योजनेतून २०२० – २१ या नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत इंदापूर तालुक्यातील चार संस्था व शाळांना कुस्ती व कबड्डी मॅट करता ३२,००,००० तर व्यायाम शाळा तसेच साहित्य कारता व जिम साहित्या करीता १७५ लक्ष निधी,तर क्रीडा साहित्य खरेदी करता ५४,००,००० सर्वसाधारण योजनेअंतर्गत ९ ग्रामपंचायतींना ४५,००,००० रक्कम ३३ संस्थांना क्रीडा साहित्य खरेदी साठी ८४.५० लक्ष असा पाच कोटी ७५ लाखाचा निधी शासनाच्या क्रीडा विभागाकडून इंदापूर तालुक्यासाठी मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
पुढे माहिती देताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, पुणे जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ नाविण्यपूर्ण योजने अंतर्गत,वालचंदनगर विद्यालय रु.८.०० लक्ष कबड्डी मॅट व ज्यु.,कॉलेज कळंब, केतकेश्वर विद्यालय रु.८.९० लक्ष कुस्ती मॅट, ग्रामपंचायत अंथुर्णे रु.८.०० लक्ष कबड्डी मॅट, ग्रामपंचायत भरणेवाडी रु.८.०० लक्ष कबड्डी मॅट असे एकूण ४ संस्थांना/शाळांना कुस्ती व कबड्डी मॅट करीता एकूण रु.३२,९०,०००/- मंजूर करण्यात आले.
तर याच योजनेच्या अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत मागाव व आर्थिक मागास मुलींचे शासकीय वसतीगृह, इंदापूर व ग्रामपंचायत निमसाखर व ग्रामपंचायत उध्दट यांना प्रत्येकी रु. ७.०० लक्ष याप्रमाणे व्यायामशाळा साहित्य करीता रु.२१,०० लक्ष निधी तसेच अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची निवासी शाळा तरंगवाडी शासकीय वसतीगृह इंदापूर,ग्रामपंचायत जंक्शन, ग्रामपंचायत पिंपरी खुर्द, ग्रामपंचायत वडापुरी, इंदापूर न.प. सिटी सर्वे नं.३७००, ४१८५, २०७/२ , ग्रामपंचायत झगडेवाडी, ग्रामपंचायत भरणेवाडी, ग्रामपंचायत अंथुर्णे ग्रामपंचायत हगारेवाडी,ग्रामपंचायत वालचंदनगर, ग्रामपंचायत शिरसटवाडी, ग्रामपंचायत शेळगाव, ग्रामपंचायत गोखळी, ग्रामपंचायत शहा, ग्रामपंचायत वरकुटे, ग्रामपंचायत रुई, ग्रामपंचायत थोरातवाडी, ग्रामपंचायत कुरवली, ग्रामपंचायत आनंदनगर अशा एकूण २२ संस्थांना/ ग्रामपंचायतींना प्रत्येकी रु. ७.०० लक्ष याप्रमाणे रु.१५४.०० लक्ष ओपन जिम साहित्य करीता मंजूर करण्यात आले. अशा प्रकारे व्यायाम शाळा साहित्य करीता रु.२१.०० लक्ष व ओपन जिम साहित्य करीता रु. १५४.०० लक्ष असे एकूण रु.१७५.०० लक्ष निधी मंजूर करण्यात आला.
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच निवासी शाळा यांना क्रीडांगण विकास अनुदान योजना(अनुसुचित जाती उपयोजना) सन २०२०- २१ मध्ये अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची निवासी शाळा तरंगवाडी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतीगृह, जि.प.शाळा विठ्ठलवाडी, जि.प.शाळा शिरसटवाडी, जि.प.शाळा व्याहाळी, जि.प.शाळा जाधववाडी केंद्र, काटीबीट निमगाव केतकी, जि.प.शाळा बिरोबावाडी, जि.प.शाळा इंदापूर नं. ४ ,सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, जि.प.शाळा काझड, जि.प.शाळा पंधारवाडी, जि.प.शाळा पेटकरवस्ती, जि.प.शाळा पाटीलवस्ती वरकुटे खुर्द, जि.प.शाळा काळेवस्ती केंद्र, निमगांव केतकी, जि.प.शाळा लाकडी, निरगुडे, जि.प.शाळा बिजवडी केंद्र, गलांडवाडी नं.१, राधिका माध्यमिक विद्यालय अशा एकूण १८ शाळांना/ संस्थांना प्रत्येकी रु.३.०० लक्ष प्रमाणे क्रीडा साहित्य खरेदी करीता रु. ५४,००,०००/- मंजूर करण्यात आले अशीही माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली.
साहित्य (सर्वसाधारण) योजनेअंतर्गत् ग्रामपंचायत चाकाटी व ग्रामपंचायत कळंब या दोन गामपंचायतींना व्यायाम शाळा साहित्य करीता प्रत्यकी रु. ५.०० लक्ष याप्रमाणे रु.१०.०० लक्ष व ग्रामपंचायत सनसर, ग्रामपंचायत गोखळी पारेकरवस्ती, ग्रामपंचायत वकील वस्ती, शिक्षण प्रसारक मंडळ निरा नरसिंगपूर चैतन्य विद्या महाविद्यालय, ग्रामपंचायत जांब, जि.प.शाळा शेलारपट्टा पळसदेव, न्यू भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, काझड अशा एकूण ७ गामपंचायत तसेच संस्थांना ओपन जिम साहित्य करीता प्रत्येकी रु.५.०० लक्ष याप्रमाणे रु.३५.०० लक्ष मंजूर करण्यात आले. असे एकूण ९ ग्रामपंचायत / संस्थांना प्रत्येकी रु.५.०० लक्ष प्रमाणे व्यायाम शाळा साहित्य व ओपन जीम साहित्य करीता रु. ४५,००,०००/- मंजूर करण्यात आले.
खास बाब म्हणून जिल्हा वार्षिक योजना सन २०२०- २१ मध्ये जि.प.शाळा पडतस्थळ, जि.प.शाळा पिटकेश्वर, जि.प.शाळा अगोती नं.२, जि.प.शाळा ढुकेवस्ती, जि.प.शाळा यादववस्ती, जि.प.शाळा अंथुणे जि.प.शाळा धापटेवाडी, जि.प.शाळा सराफवाडी, जि.प. शाळा हनुमानवाडी, जि.प.शाळा अशोकनगर (भवानीनगर), ग्रामपंचायत शेळगांव, जि.प.शाळा करेवस्ती, जि.प.शाळा वडापुरी वस्ती, जि.प.शाळा माळीवस्ती, जि.प.शाळा गोखळी, जि.प.शाळा शिंदेवस्ती (गळाडवाडी नं.२), जि.प.शाळा निमसाखर, जि.प.शाळा गौराईमळा, जि.प.शाळा वायसेवाडी, जि.प. शाळा बारवकर वस्ती, जि.प.शाळा शेळगाव, जि.प.शाळा तेलओढा, जि.प.शाळा भोंगळेवस्ती, जि.प.शाळा हगारेवाडी, जि.प.शाळा भरणेवाडी, जि.प.शाळा झगडेवाडी, जि.प.शाळा हिंगणगाव, जि.प.शाळा हेगडेवाडी, जि.प.शाळा महादेवनगर अशा एकूण २९ शाळांना संस्थांना क्रिडा साहित्य करीता प्रत्येकी रु.२.५० लक्ष याप्रमाणे रु.७२.५० लक्ष तसेच तालुका क्रीडा संकुल समिती इंदापूर, एन. ई हायस्कूल निमसाखर, न्यु भैरवनाथ विद्यालय, काझड, चैतन्य विद्यालय अशा एकूण ४ शाळांना/संस्थांना क्रिडा साहित्य करीता रु.३.०० लक्ष याप्रमाणे १२ लक्ष मंजूर करण्यात आले. अशा प्रकारे एकूण ३३ संस्थांना क्रीडा साहित्य करीता रु.८४.५० लक्ष मंजूर करण्यात आले.अंथुर्णे येथे क्रीडा संकुल बांधण्याकरीता रु.१,८१,५८,००० निधी मंजूर करण्यात आला असल्याचीही माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.