Rahul Gandhi Helicopter – हेलिकॉप्टरमध्ये इंधन संपल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शहडोलमध्ये रात्र काढावी लागली. यावेळी त्यांनी रात्री जंगलातील ढाब्यावर जाऊन जेवण केले. त्यानंतर पहाटे पाच वाजता उमरिया हवाई पट्टीवरून दिल्लीसाठी त्यांनी उड्डाण केले.
ते शहडोल ते उमरियाला रस्त्याने गेले. वाटेत महुआ गोळा करणाऱ्या महिलांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. । Rahul Gandhi । Helicopter
मध्य प्रदेशातील सिवनी आणि शहडोल लोकसभा जागांवर काँग्रेस उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी राहुल गांधी सोमवारी मध्य प्रदेशात आले होते.
त्यांनी सिवनी येथे सभेला संबोधित केले आणि त्यानंतर शहडोल येथील बाणगंगा जत्रेच्या मैदानावरही सभा घेतली. यानंतर त्यांना परतावे लागले तेव्हा हेलिकॉप्टरचे इंधन संपले. हवामानही बिघडले होते. त्यामुळे राहुल यांना शहडोलमध्ये रात्र काढावी लागली.
राहुलना शहडोल येथून हेलिकॉप्टरने जायचे होते. त्याऐवजी त्यांनी रस्त्याचा मार्ग निवडला. शहाडोल येथून पहाटे पाच वाजता निघाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कार थांबवली आणि महुआ गोळा करणाऱ्या महिलांमध्ये पोहोचले. तेथे त्यांच्याशी चर्चा केली.
तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काँग्रेसचे सरकार आल्यास तुमच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही निश्चितपणे ठोस पावले उचलू, असेही ते म्हणाले. आदिवासी महिला व पुरुषांसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
राहुल शहडोल येथील सूर्या इंटरनॅशनल हॉटेलमध्ये ते थांबले होते. रात्री त्यांनी हॉटेल सोडले आणि उमरिया जिल्ह्यातील पाली पोलीस स्टेशन हद्दीतील मदारी ढाब्यावर जेवण केले. हा परिसर बांधवगड व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे.
येथे वाघांचे दर्शनही वारंवार होत असते. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी आणि मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते उमंग सिंगर हेही उपस्थित होते. । Rahul Gandhi । Helicopter