भारतीय हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ग्रॅहम रीड यांच्या नियुक्तीला साईची मंजुरी

नवी दिल्ली – भारतीय हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ग्रॅहम रीड यांची नियुक्ती करण्याला भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) हिरवा कंदील दाखवला असून त्याबाबतचे मंजुरीपत्र हॉकी इंडियाला मिळाले असल्याने आता त्यांचा संघाच्या प्रशिक्षकपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हॉकी इंडियाने गेल्याच महिन्यात रीड यांच्या नावाची शिफारस “साई’कडे केली होती. त्याला “साई’ने सोमवारी होकार कळवला आहे.

पुढील वर्षांपर्यंत ग्रॅहम रीड यांचा कार्यकाळ असल्याचे समजत आहे. मात्र कामगिरीच्या आधारावर त्यांना 2022 साली होणाऱ्या एफआयएच विश्वचषक हॉकी स्पर्धेपर्यंत मुख्य प्रशिक्षकपदी कायम ठेवण्यात येईल, असेही समजते. रीड यांना महिन्याला 10 लाखांपेक्षा जास्त मानधन देण्यात येणार आहे. कुटुंबासोबत ते बेंगळूरु येथे राहतील, असे हॉकी इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.