Arti Singh Dipak Chauhan Wedding| प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आणि अभिनेत्री आरती सिंहने दीपक चौहानशी लग्नगाठ बांधली. लग्नाआधी त्यांचे विविध कार्यक्रमपार पडले. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियाद्वारे समोर आले होते. यानंतर आता आरतीच्या लग्नात काका गोविंदाने देखील हजेरी लावली होती. बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा आरती आणि कृष्णा अभिषेकचा मामा आहे. मात्र त्यांच्या कौटुंबिक वाद असल्याने गोविंदा लग्नाला हजेरी लावणार की नाही असा प्रश्न होता.
अखेर त्याने आरतीच्या लग्नाला हजेरी लावली. मात्र लग्नाआधीच्या कार्यक्रमाला त्याने हजेरी लावली नव्हती. . आरती सिंहच्या लग्नातील गोविंदाचा व्हिडिओ समोर आला आहे. गोविंदाने आरती आणि दीपकला त्यांच्या नवीन आयुष्यासाठी आशीर्वाद दिले. कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मिरा शाहने मामा गोविंदा आरतीच्या लग्नाला आले तर आनंद होईल, असं म्हटलं होतं. Arti Singh Dipak Chauhan Wedding|
View this post on Instagram
अखेर गोविंदा आल्याने ते खुश असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी गोविंदाने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. त्याच्या एंट्रीने सर्वांचे लक्ष वेधले होते. विशेष म्हणजे गोविंदा पापाराझींना पोज देण्याऐवजी गोविंदा कार्यक्रमस्थळी गेला. Arti Singh Dipak Chauhan Wedding|
आरती सिंह आणि दीपक चौहान यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. या लग्नाला अनेक टीव्ही स्टार्सनी आपल्या कुटुंबियांसोबत हजेरी लावली होती. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. गोविंदा आरतीच्या लग्नाला आल्याने कश्मिरा आणि कृष्णाने खूप आनंद व्यक्त केला.