गुगलने “प्ले स्टोअर’वरून हटवली तब्बल 85 ऍप्स

न्युयॉर्क: गुगलने सुरक्षेच्या कारणास्तव प्ले स्टोअरवरून तब्बल 85 ऍप्स हटवली आहेत. ट्रेंड मायक्रोमधील सुरक्षा संशोधकांना या ऍप्समध्ये हानीकारक ऍडवेअर हा व्हायरस सापडला आहे. यानंतर गुगलने हे पाऊल उचलले आहे. या 85 ऍप्समध्ये सुपर सेल्फी, कॉस कॅमेरा, पॉप कॅमेरा आणि वन स्ट्रोक लाइन पजल हे ऍप्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

ट्रेंड मायक्रोमधील मोबाइल थ्रेट रिस्पॉन्स इंजिनियर इकोलोर जू यांनी शुक्रवारी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, आम्हाला गुगल प्ले स्टोअरवर ऍडवेअरच्या रियल लाइफ परिणामाचे आणखी एक उदाहरण आढळले आहे. ट्रेंड मायक्रो त्याला अँड्रॉइड ओएस हाइडेंडा एचआरएक्‍सएच म्हणून ओळखतो. हा जाहिराती प्रदर्शित करतो आणि याला थांबविणे अवघड आहे. असेही त्यांनी सांगितले. हा वापरकर्त्यांची वर्तणूक आणि वेळ ट्रिगरद्वारे ओळखी शोधण्यासाठी अद्वितीय तंत्र वापरतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे प्रभावित करणाऱ्या अनेक ऍप्समध्ये फोटोग्राफी आणि गेमिंग ऍप्सचा समावेश असतो. ज्यांना आठ लाखांहून अधिक जणांनी डाउनलोड केले गेले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)