वर्षभराच्या बंदीनंतरही स्मिथच टॉपर

दुबई: अ‍ॅशेस मालिकेत दमदार कामगिरीकरत ऑस्ट्रेलियन संघाला भक्कम स्थितीत नेऊन ठेवणाऱ्या स्टीव्ह स्मिथच्या कामगिरीचे आयसीसीने कौतुक केले आहे.

आयसीसीने त्याच्या कामगिरीचे कौतुक करताना स्मिथला अव्वल ठरवणारी आकडेवारी देखील शेअर केली आहे. चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात एक वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून ऑगस्टमध्ये स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. अर्धे वर्ष सरल्यानंतर पुनरागमन करुनही या कॅंलेंडर वर्षात स्मिथच्या नावे सर्वाधिक धावांची नोंद आहे.

इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत स्मिथने 144 आणि 142 धावांची खेळी केली होती. बंदीनंतर ही त्याचा पहिला कसोटी सामना होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात जोफ्रा आर्चरचा उसळता चेंडू लागल्यानंतर झालेल्या दुखापतीनंतर स्मिथ तिसऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकला होता. त्यानंतर चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने दमदार द्विशतक साजरे केले.

2019 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 589 धावांसह स्मिथ अव्वलस्थानी आहे. इंग्लंडचा बेन स्टोक्‍स (513), ऑस्ट्रेलियन ट्रॅविस हेड (503), दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक (428) आणि श्रीलंकन दिमुथ करुणारत्ने (427) धावा केल्या आहेत. पहिल्या पाचमध्ये एकाही भारतीय फंलदाजाचा समावेश नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)