सासवड – काही अटी व शर्तींवर सासवड व जेजुरी (ता. पुरंदर) शहरातील सर्व दुकाने बुधवार (दि. 6) पासून सुरू करण्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी परवानगी दिली आहे. यासाठी सासवड व जेजुरी नगरपालिकेने नियमावली तयार केली असून या नियमावलीनुसार दुकाने उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर पुरंदर तालुक्यातील इतर (ग्रामीण) भाग राज्य शासनाच्य आदेशाप्रमाणे यापुर्वीच अटी व शर्तीनुसार खुलाच आहे, अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली.
पुरंदर तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सासवडचे पोलीस निरीक्षक, पुरंदरचे वैद्यकीय अधीक्षक, सासवड, जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आदेश दिले आहेत.
जरी सर्व दुकाने उघडण्यास परवागी दिली असली तरी कोणत्याही दुकानात गर्दी होवू नये व करोनाचा शिरकाव होवू नये यासाठी नगरपालिकेने काही नियमावली तयार केल्या असल्या असून त्याचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
सर्व दुकानांना त्यांना नेमून दिलेल्या वेळेत सुरू करण्यासाठी सासवड शहर व्यापारी असोसिएशन, कापड व्यवसायिक, सोनार व्यवसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे अटी व शर्तीचे पालन करूनच दुकाने सुरू करावयाची असल्याचे सासवड, जेजुरी नगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात
आले आहेत.
नगरपालिकेची नियमावली:
उत्पादन शुल्कचे आयुक्तांच्या यांच्या आदेशानुसार सीलबंद मद्यविक्री सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत
किराणा दुकाने, दूध संकलन व विक्री तसेच मेडिकल दुकाने
दिवसभर सुरू राहणार आहेत
भाजी व फळे विक्री हातगाड्यांवर फिरून दिवसभर विक्री करता येणार
बेकरी, कापड दुकाने, भाजी दुकाने, भांडी व स्टेशनरी दुकाने, इलक्ट्रिक दुकाने, तंबाखू विक्री ही दुकाने दुपारी 2 ते 6 सायंकाळी पर्यंत सुरू राहतील.
सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांचे शोरूम दुपारी 2 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू राहतील
या आहेत अटी व शर्ती:
दुकाने सुरू करताना दुकानासमोर 5 पेक्षा अधिक ग्राहक एकावेळेस असता कामा नये
2 ग्राहकांमध्ये किमान 6 फूट अंतर असणे अनिवार्य
दुकानासमोर 6 फुटावर वर्तुळ आखणे बंधनकारक
दुकानातील कामगार किंवा ग्राहकास सर्दी, खोकला व ताप यासारखी लक्षणे असतील त्यांना दुकानात प्रवेश देऊ नये
दुकानाबाहेर ग्राहकांसाठी हॅंडवॉश, सॅनिटायझर उपलब्ध करण्याची जबाबदारी दुकान मालकाची
दुकान मालक, दुकानातील कर्मचारी व ग्राहकांनी मास्क लावणे बंधनकारक राहील
दिलेल्या वेळेतच दुकान उघडणे बंधनकारक आहे.