जामखेड (प्रतिनिधी) : जामखेड शहरात सापडलेले चार कोरोना बाधित रुग्णांचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांना लवकरच बुथ हॉस्पिटलमधुन डीचार्ज मिळणार आहे. या चारही व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आसल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पुढील चौदा दिवस जामखेड येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.
जामखेड शहरातील एका धार्मिक स्थळांमध्ये आलेले परदेशी नागरिक यांना ताब्यात घेऊन तपासणीसाठी नगर येथे नेल्यानंतर त्यामधी दोन परदेशी नागरिक कोरोना बाधित आढळल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या जामखेड शहरातील चार जणांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली होती. ही बाब समोर येताच प्रशासनाने सोमवारी तात्काळ या ३१ संशयितांना ताब्यात घेत त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते.
तालुक्यात कोरोना बाधिताची रूग्णांची संख्या एकुण चार झाली होती. या सर्वांची दुसऱ्यादा कोरोना तपासणी करण्यात आली. त्यानंतर २० दिवसांनी हे रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. रविवारी (१९ एप्रिल) अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयातून या चारही जणांना जामखेड तालुक्यातील अधिग्रहित केलेल्या एका खासगी रूग्णालयात अलगीकरणासाठी दाखल करण्यात येणार आहे.