जामखेड (प्रतिनिधी) – नगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुक पडघम जोरदारपणे वाजु लागले असुन भाजपाकडुन डॉ सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर झाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निलेश लंके यांनाच उमेदवारी जाहीर होणार असल्याच्या चर्चांना वेग आला असताना जामखेड मध्ये एका कार्यक्रमादरम्यान राणी लंके यांनी नगर दक्षिण मधुन लंके कुटुंबातीच उमेदवार असणार असुन आम्हीच तुतारी वाजवणार असल्याची प्रतिक्रिया राणी लंके यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके नगर दक्षिणची जागा लढविणार असल्याने खूपच चर्चेत आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि अजित यांनी वेगळी भूमिका घेत सरकारमध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अजित पवार यांच्या समवेत निलेश लंके यांनी देखील सरकारमध्ये जाण्याचे ठरवले.
आता मात्र अजित पवार यांच्या गटाला लंके लवकरच सोडचिट्टी देणार असे संकेत मिळतं आहेत. लंके यांनी मोठ्या साहेबांची अर्थातच शरद पवार यांची पुण्यात नुकतीच भेट घेतली होती. खरेतर तेव्हाच ते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील अशा चर्चा होत्या. मात्र शरद पवार तथा लंके यांनी यासंदर्भात सध्या मौन बाळगले आहे.
पण, निलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घडली आहे तेव्हापासून लंके यांचे सूर बदलले आहेत. सोशल मीडियावर घड्याळाचा वापर कमी झाला आहे आणि तुतारीचा वापर तथा पवार साहेबांचा फोटो त्यांच्या बॅनरवर अधिक झळकू लागला आहे. दरम्यान आज जामखेड येथील एका दुकानाच्या उद्घाटनप्रसंगीडॉ सुजय विखे हेही आले होते.
त्यांच्या हस्ते उद्घाटन होताच ते निघून जाताच राणी लंके यांचे आगमन झाले यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की आगामी नगर दक्षिणची तुतारी आम्हीच वाजवणार असुन आमच्या दोघांपैकी एक जण निवडणूकीला उभे रहाणार आहे त्यामुळे नगर दक्षिणची तुतारी लंके कुटूंबियच वाजवणार असुन जामखेड तालुक्यातुन आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळात आहे त्याच जोरावर आम्ही निवडणूकीला जाणार असल्याचे सुतोवाच केले.