राहाता – राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ज्ञानेश्वर गोंदकर यांची तर उपसभापती आण्णासाहेब कडू यांची बिनविरोध झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्व जागांवर विजय संपादन केला आहे.
नुतन संचालक मंडळाची पहिली सभा सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडीसाठी बोलविण्यात आली होती. सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी रावसाहेब खेडकर यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया झाली. सभापती व उपसभापतीपदासाठी अनुक्रमे गोंदकर व कडू यांचे दोघांचे अर्ज आल्याने या दोघांची निवड बिनविरोध करण्यात आली.
यावेळी संजय पाटील, सचिव उध्दव देवकर अदिसह संचालक मंडळातील सदस्य विजय कातोरे, संतोष गोर्डे, दत्तात्रय गोरे, ज्ञानदेव चौधरी, बाबासाहेब शिरसाठ, मिना निर्मळ, रंजना लहारे, दिलीप गाडेकर, राजेंद्र धुमसे, जालिंदर गाढवे, राहुल धावणे, सुभाष गायकवाड, शांताराम जपे, सचिन कानकाटे, निलेश बावके, बाबासाहेब कांदळकर अदि उपस्थित होते.
राहाता बाजार समिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात अग्रगण्य आहे. या बाजार समितीत शेतकरी हिताला महत्व दिले जात आहे. या बाजार समितीचा नावलौकिक चांगला आहे. यापुढेही आपण व आपले संचालक मंडळ बाजार समितीचा कारभार चांगलाच करेल असा विश्वास सभापती ज्ञानेश्वर गोंदकर यांनी व्यक्त केला.