नवी दिल्ली – बुधवारी अमेरिकेचे पत धोरण जाहीर होणार असताना जागतिक पातळीवर सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. अशा परिस्थितीत दिल्ली सराफात मंगळवारी सोन्याचा दर 110 रुपयांनी कमी होऊन 66,250 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर मात्र 500 रुपयांनी वाढून 76,500 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. ( Gold-Silver Rates)
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, जोपर्यत अमेरिकेचे पतधोरण जाहीर होत नाही तोपर्यंत सोने आणि चांदीचे दर अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत जागतिक बाजारात सोन्याचा दर 2,159 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा दर 24.91 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.