Gold Silver Rates | अमेरिकेत महागाई जास्त पातळीवर असल्यामुळे व्याजदर कपात लांबणार आहे. अशा परिस्थितीत सोन्यातील बरीच गुंतवणूक अमेरिकेतील रोखे बाजाराकडे आणि डॉलरकडे वळत आहे. परिणामी कालपासून सुरू असलेली सोन्याची घसरण आजही चालूच राहिली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 80 रुपयांनी कमी होऊन 62,270 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. कालही सोन्याचा दर 600 रुपयांनी कोसळला होता. मात्र चांदीचा दर कमी पातळीवर असल्यामुळे आज चांदीच्या दरात 600 रुपयांची वाढ होऊन चांदीचा दर 74,600 रुपये प्रति किलो झाला.
Japan and UK Face Recession : उत्पादकता कोसळल्याने जपान आणि ब्रिटनमध्ये मंदी…
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,993 डॉलर आणि चांदीचा दर 22.50 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस या संस्थेचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की अमेरिकेच्या पतधोरणाचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होत आहे.