नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर कमी होत आहेत. त्या प्रमाणात भारतीय बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात घट होत आहे. मंगळवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 289 रुपयांनी कमी होऊन 51,877 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 841 रुपयांनी कमी होऊन 58,480 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक वाजारात सोन्याचा दर 1,771 डॉलर व चांदीचा दर 20.25 डॉलर प्रत्येक औंस या पातळीवर होता. एचडीएफसी सिक्युरिटी या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, तैवानवरून अमेरिकेत- चीनदरम्यान संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वाढल्यामुळे डॉलर वधारत आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर होत आहे.