मुंबई – पहिल्या तिमाही झोमॅटा कंपनीचा तोटा निम्म्याने कमी झाला असल्याच्या बाबीची सकारात्मक दखल गुंतवणूकदारांनी घेतली. गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरची जोरदार खरेदी केल्यामुळे झोमॅटो कंपनीचा शेअर मंगळवारी 20 टक्क्यापर्यंत वाढला होता.
पहिल्या तिमाहीत या कंपनीला केवळ 186 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत झोमॅटो कंपनीला 360 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. दरम्यानच्या काळामध्ये कंपनीने व्यवस्थापनात अमुलाग्र बदल करण्याचे जाहीर केले आहे.
त्यामुळे आगामी काळात कंपनीचा नफा वाढेल या दृष्टिकोनातून काही गुंतवणूकदार या कंपनीच्या शेअरची खरेदी करीत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. गेल्या वर्षी या कंपनीची शेअर बाजारावर नोंदणी झाली होती. त्यावेळी गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र त्यानंतर त्या कंपनीचा शेअर त्याच बऱ्याच कमी पातळीवर आला आहे.