Gold Silver Price : इस्रायल आणि हमास यांच्यात जोरदार युद्ध सुरू आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली सुरक्षा दल हमासला चोख प्रत्युत्तर देत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु झालेल्या या युद्धाचा फटका आता भारताला देखील बसत असल्याचे दिसत आहे. कारण आणि इस्राइल -हमास यांच्यातील संघर्षामुळे सोन्याचे भाव वाढले आहेत.
देशात आता सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत. त्यातच आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सोने महागले असल्याचे सांगण्यात येत आहे. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात 200 ते 370 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ दिसून येत आहे.
22 कॅरेट सोन्याचा भाव 53,600 रुपयांच्या वर आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,500 रुपयांच्या वर गेला आहे. चांदीचा भाव आज स्थिर राहिला. चांदीचा भाव 72,600 रुपयांवर गेला आहे.
दरम्यान, देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा हैदराबाद – 58,530 रुपये, कोलकत्ता – 58,530 रुपये, गुरुग्राम – 58,350 रुपये, मुंबई – 58,530 रुपये पुणे – 58,530 रुपये पटना – 58,250 रुपये असा असल्याचे सांगण्यात येत आहे.