मुंबई – अभिनेता रितेश देशमुखची आणि जिनिलिया देशमुखची जोडी लोकप्रिय आहे. आज अभिनेता रितेश देशमुखची आई वैशाली देशमुख यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त रितेश आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. सासुबाईंसाठी शेअर केलेली जिनिलिया पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
जिनिलियाची पोस्ट
जिनिलियाने एक फॅमिली फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, “प्रिय आई, एक पुरोगामी स्त्री कशी असते, हे मला शिकवल्याबद्दल धन्यवाद, माझ्यावर स्वत:च्या मुलीप्रमाणे प्रेम केल्याबद्दल धन्यवाद, माझी मराठी भाषा दररोज सुधारल्याबद्दल धन्यवाद. सर्वात जास्त माझी आई असल्याबद्दल धन्यवाद. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
View this post on Instagram
रितेशने सुद्धा वैशाली देशमुख यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, “आई लव्ह यू, तू आमची लाईफ आहेस” या पोस्टनंतर वैशाली देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.