किमती घसरल्यामुळे चौथ्या तिमाहीत सोन्याच्या मागणीत वाढ

मुंबई: जानेवारी ते मार्च 2019 या चौथ्या तिमाहीत सोन्याचे दर कमी पातळीवर असल्यामुळे सोन्याची मागणी 5 टक्‍क्‍यांनी वाढली. या तिमाहीत भारताने 159 टन सोन्याची आयात केली. जागतिक सुवर्ण परिषदेने या संबंधात जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत भारताने 151 टन सोन्याची आयात केली होती.

या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत मूल्यात सोन्याची आयात 13 टक्‍क्‍यांनी वाढून 47,010 कोटी रुपये झाली आहे, जी की गेल्यावर्षी चौथ्या तिमाहीत 41,680 कोटी रुपये एवढी होती.

या अहवालाबाबत स्पष्टीकरण देताना जागतिक सुवर्ण परिषदेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पीआर यांनी सांगितले की, या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वधारल्यामुळे भारतातील सोन्याचे दर 32,000 रुपयांपर्यंत खाली आले होते. या कालावधीत सोने खरेदीसाठी शुभ मानल्या जाणाऱ्या दिवसांची संख्या 21 होती, जी की गेल्यावर्षी केवळ 8 होती. या कारणामुळे सोन्याची मागणी वाढली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.