कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत मी लपवले नाही- अक्षय कुमार

मुंबई: अभिनेता अक्षय कुमारने आपल्या नागरिकत्वाबाबत बोलला आहे. आपली ट्विटर अकाउंटवर त्याने अखेर आपले मत मांडले आहे. अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली त्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. नेटकऱ्यांनी अक्षय कुमारने मतदान केले का?, असा प्रश्न देखील उपस्थित केला होता.

अक्षय कुमार म्हणाला, माझ्या नागरिकत्वाबाबत एवढी रुची का दाखवली जात आहे. त्यावरुन विनाकारण नकारात्म संदेश का फिरवले जात आहेत. मी माझ्या कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत कधीही लपवले नाही. तसेच माझ्याजवळ कॅनडाचा पासपोर्टही आहे.

तसेच, हेही सत्य आहे की, मी गेल्या 7 वर्षात एकदाही कॅनडाला गेलो नाही. मी भारतात काम करतो आणि भारतातच टॅक्स भरतो,” असे ट्विट अक्षयने केले आहे. तसेच माझे भारत देशावर किती प्रेम आहे, हे सिद्ध करुन दाखवायची गरज मला वाटत नाही. मी देशाला अधिक मजबूत बनविण्यासाठी माझं छोटसं योगदान देत आहे. असे अक्षय कुमारने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.