ऑक्‍टोबर महिन्यात मंदी निश्‍चित

ग्राहक खरेदी टाळणार; मागणी वाढणार नाही

नवी दिल्ली: कोरोना व्हायरस मुळे गेले तीन महिने उत्पादन आणि विक्रीवर परिणाम झाला आहे दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने 21 लाख कोटी रुपयांचे पॅकेज पोवाडा परिस्थिती सुधारण्यासाठी जाहीर केले आहे मात्र येथूनच खरेदी करण्याचा कल कमी झाल्यामुळे या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाही मध्ये भारतामध्ये मंदी निर्माण होणार असल्याचे विश्‍लेषकांनी म्हटले आहे.

सध्या परिस्थिती इतकी बिघडली आहे की त्याचे मूल्य अंक नाही करता येणे शक्‍य झालेले नाही त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये मध्यमवर्गीय आणि गरीब लोक अनावश्‍यक वस्तू खरेदी करण्याचे टाळत आहेत उत्पन्नावर परिणाम होणार असल्यामुळे शक्‍यतो खरेदी टाळून बचत करण्यावर बर राहण्याची शक्‍यता अशा अवस्थेत मागणी नसल्यामुळे मंदिर उग्ररूप धारण करण्याची शक्‍यता असल्याचे अँड ब्रॅंड स्ट्रीट या संस्थेने केलेल्या संशोधनात म्हटले आहे.

केंद्र सरकारने 21 लाख कोटी रुपयांच्या पॅकेज जाहीर केले या पॅकेजची किती परिणामकारक अंमलबजावणी होते त्याचबरोबर लॉक डाऊन किती परिणामकारक पद्धतीने मागे घेतले जाते यावर बरेच काही अवलंबून आहे जर नागरिक उद्योग आणि सरकारने या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वेगात प्रयत्न केले तर मंदीची क्षमता कमी करण्यास मदत होऊ शकेल.

केंद्र आणि राज्य सरकारने मार्च महिन्यापासून योग्यवेळी अतिशय परिणामकारक उपाययोजना केल्या आहेत योग्य वेळी भारतात लोक डाऊन सुरू करण्यात आले त्याचबरोबर सुरुवातीच्या काळात गरीबांना थेट मदत करण्यात आले त्यानंतर विविध क्षेत्रांना थेट पैसे देण्याऐवजी कमी व्याजदरावर भांडवल उपलब्ध करण्यात येत आहे दरम्यानच्या काळात रिझर्व बॅंकेने व्याजदर वीस वर्षाच्या नीचांकी पातळीवर आणले आहेत.

त्यामुळे अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित होण्यास मदत मिळत आहे यामुळे पुरवठा पातळी सुधारण्यास मदत होणार असली तर ये नागरिकांच्या हातात पैसे नसल्यामुळे आणि त्यांना उत्पन्नाचे हमी नसल्यामुळे मागणी वाढेल की नाही याबाबत शंकेचे वातावरण आहे जर मागणी वाढली नाही तर तयार झालेल्या उत्पादनाचा उपयोग होणार नाही आणि मंदी निर्माण होईल असे या अहवालात म्हटले आहे. त्याचबरोबर एनबीएफसी साठी खऱ्या अर्थाने मदत जाहीर झालेली नाही केंद्र सरकारने कर्जासाठी हमी दिली असली तरी अगोदरच अडचणीत असलेल्या बॅंका कर्ज वितरणासाठी पुढाकार घेतील की नाही याबाबत शंका घेण्यासारखे वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.