शेतीविषयक कर्जवाटपावर कसलेही बंधन नाही

पुणे: शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या शेतीविषयक कर्जवाटपाबाबत आम्ही कोणतेही बंधन घातलेले नाही. बॅंकेच्या निवडक 8 विभागात शेतकऱ्यांना शेती कर्ज मंजुरी प्रक्रिया गतिमान करण्यासाठी निर्देश दिलेले आहेत, असे महाराष्ट्र बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

नैसर्गिक आपत्तीमधील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीक कर्जाचे रूपांतरण तथा दीर्घ मुदत कर्जाचे पुनर्व्यवस्थापन किंवा पुनर्गठन करण्याचे काम तसेच सध्याचे पीक कर्ज किंवा पतमर्यादेचे नूतनीकरण शाखा पातळीवरच होईल. फक्‍त नवे किंवा प्रथमच सादर झालेले कर्जप्रस्ताव संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवले जाईल. निर्णय प्रक्रिया गतिमान करण्यासाठी उपाय योजण्यात आले आहेत. 2019 च्या खरीप हंगामासाठी मे 2019 पासून पुढे संपूर्ण देशभर शेतकरी मेळावे आयोजित करून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुलभ आणि वेळेवर केला जाईल, असे बॅंकेने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.