पुणे : लॉकडाऊन उठल्यावर गुन्हेगार पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. मागील 4 महिने शांत बसलेले सोनसाखळी चोर पुन्हा रस्त्यावर धुमाकूळ घालण्यास बाहेर पडले आहेत. हडपसर येथे रविवारी पहाटे 9 वाजण्याच्या सुमारास एका महिलेचे मंगळसूत्र चोरण्यात आले. याप्रकरणी 2 अज्ञात व्यक्तींविरुध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक चाळीस वर्षीय महिला तीच्या मुलीसह वृत्तपत्र आणि दुध घेऊन घराकडे चालली होती. यावेळी सीटी पॉईंट सोसायटीच्या रस्त्यावर दुचाकीवरुन दोघे त्यांच्या जवळ आले. यातील मागे बसलेल्याने मंगळसूत्र हिसकावले. यानंतर दोघेही दुचाकीवरुन पळून गेले. याची किंमत सुमारे 3 हजार इतकी होती. पोलिस घटनास्थळ व आजूबाजूच्या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत.