पुणे : तीघा जणांच्या टोळक्याने एकाला बेदम मारहाण करुन 700 रुपये लूटले. याप्रकरणी तातडीने एका आरोपीस स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. मोबीन अन्वर शेख( 21, डायस प्लॉट, गुलटेकडी) असे आरोपीचे नाव आहे.
मुस्ताक शेख(वय 45 रा.गुलटेकडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, ते पीएमटी कॉलनीत शनिवारी रात्री उभे होते. ते रहात्या इमारतीसमोर सिगरेट पीत होते. यावेळी अटक आरोपी व त्याचे दोन साथीदार तेथे आले. त्यांनी फिर्यादीला जीवे ठार मारण्याची धमकी देत, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर त्यांच्या खिशातील 680 रुपये व सिगरेटचे पाकिट जबरदस्तीने काढून नेले.
याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस.एम.अदलिंग करत आहेत.