नवी दिल्ली : – बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अनेक देशांतून पाठिंबा मिळत आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार व मेरिलिबोर्न क्रिकेट क्लबचा (एमसीसी) अध्यक्ष कुमार संगकारा यानेही या पदासाठी गांगुलीच सर्वोत्तम असल्याचे सांगितले आहे.
गांगुलीकडे क्रिकेटब्रेन आहे व त्याच्याच जोरावर त्याने बीसीसीआयची प्रतिमाच बदलून टाकली आहे. अत्यंत योग्य नियोजन आणि धडाकेबाज निर्णयांच्या बळावर त्याने भारतीय क्रिकेटचा कायापालट केला. गांगुली जर आयसीसीचा अध्यक्ष झाला तर जागतिक क्रिकेटमध्ये देखील तो आपल्या अनुभवाच्या जोरावर यशस्वी होईल, असा विश्वासही संगकाराने व्यक्त केला.