नवी दिल्ली – सोन्याचा दर 353 रुपयांनी कमी होऊन 50,503 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 123 रुपयानी कमी होऊन 60,834 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,836 डॉलर व चांदीचा दर 21.62 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. डॉलरचा भाव वधारला आहे.
त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात घट झाली असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटी या संस्थेचे विश्लेषक तपन पाटील यांनी सांगितले.