नवी दिल्ली – दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचा दर 75 रुपयांनी वाढून 51,052 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर 120 रुपयांनी वाढून 62,143 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतीक बाजारात सोन्याचा दर वाढल्यामुळे त्या प्रमाणात भारतीय बाजारात सोन्याचा दर वाडला असल्याचे एचडीएफसीचे विश्लेषक तपन पटेल यानी सांगितले. ते म्हणाले की, युध्द संपत नाही तोपर्यंत सोन्याचे दर अस्थिर राहण्याची जास्त शक्यता आहे.
जागतीक बाजारात सोन्याचा दर 1,860 डॉलर व चांदीचा दर 22.13 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.
ते म्हणाले की, डॉलर कमकूवत होत आहे, त्याचबरोबर अमेरीकेच्या रोख्यावरील परतावा कमी होत असल्यामुळेही सोन्याच्या दरात सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे.