नवी दिल्ली – मे महिन्यात प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत मागणी वाढल्यामुळे समाधानकारक वाढ झाली आहे. मात्र सेमीकंडक्टरच्या तुटवड्याचा प्रश्न अजूनही या उद्योगासमोर आहे. दरम्यान देशांतर्गत विक्रीत मारुती-सुझुकी पहिल्या क्रमांकावर कायम असून दुसऱ्या क्रमांकावर टाटा मोटर्सने बाजी मारली आहे. देशांतर्गत विक्रीत आता दुसऱ्या क्रमांकावरील ह्युंदाई तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे.
मारुती सुझुकी कंपनीने मे महिन्यात 1,34,222 कारची विक्री केली. गेल्या वर्षी मे महिन्यात करोनामुळे केवळ 35,293 कारची विक्री झाली हाती. टाटा मोटर्सने मे महिन्यामध्ये 43,341 कारची विक्री केली आहे. तर ह्युंदाई मोटर्स इंडिया या कंपनीने 42,293 कारची विक्री केली.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने 26,904 कारची विक्री केली आहे. किया इंडिया कंपनीच्या 18,718 कारची विक्री झाली तर मे महिन्यामध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटारची विक्री 10,216 इतकी झाली आहे. होंडा कार्स इंडियाने 8,188 कार विकल्या. स्कोडा कंपनीने 4,604 विकल्या. एमजी मोटर्सची विक्री 4,008 इतकी आहे.
मे महिन्यात बजाज ऑटोची देशांतर्गत विक्री तब्बल 1,12,308 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये बजाज ऑटोने केवळ 60,830 दुचाकी विकल्या होत्या. टीव्हीएस मोटार कंपनीने मे महिन्यातील 1,91,482 दुचाकी विकल्या आहेत