ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना डॉ. बापूजी साळुंखे आदर्श शिक्षक पुरस्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) – ग्लोबल टिचर अवॉर्ड पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

श्री अंबाबाईची चांदीची मूर्ती, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कोल्हापुरातील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनात रविवारी (दि.17) सकाळी दहा वाजता शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी दिली.

बापूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्यावतीने विविध उपक्रम राबविले. काही उपक्रमांचे संकल्प केले होते. त्यामध्ये या पुरस्काराचा समावेश होता. त्यानुसार बापूजींच्या नावाने पहिला पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिनी, रविवारी प्रदान केला जाणार असल्याचे प्राचार्या गावडे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.