पोलिओ लसीकरण आता 31 जानेवारीला होणार

नवी दिल्ली – देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहीम पंतप्रधानांच्या हस्ते 16 जानेवारी पासून सुरू केली जाणार आहे. जगातील ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल. त्यामुळे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रपती कार्यालयाशी सल्लामसलत करून राष्ट्रीय लसीकरण दिन किंवा पोलिओ रविवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिओ लसीकरण दिनाचा कार्यक्रम 31 जानेवारी रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

राष्ट्रपती 30 जानेवारी रोजी सकाळी 11.45 वाजता राष्ट्रपती भवनात काही मुलांना पोलिओ लसीचे थेंब देऊन पोलिओ राष्ट्रीय लसीकरण दिनाचा प्रारंभ करतील. कोविड व्यवस्थापन आणि लसीकरण सेवा तसेच बिगर कोविड अत्यावश्‍यक आरोग्य सेवा एकमेकांवर विपरित परिणाम न होता सुरु राहाव्यात, या आरोग्य मंत्रालयाच्या धोरणाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.