ब्रिस्बेन – भारतीय संघ ब्रिस्बेनला दाखल झाला. मात्र, सामन्यापेक्षा संघ राहात असलेल्या हॉटेलमध्ये खेळाडूंना नियमांचा तर त्रास तर होतच होता. मात्र, बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला याबाबत खडसावल्यानंतर सर्व सुविधा पुरवण्याबाबत खात्री मिळवली आहे.
भारतीय संघाला ब्रिस्बेन येथील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, खेळाडूंना हाऊसकिपिंगसह अनेक कामे स्वतःच करावी लागत आहेत.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमीन यांनी याबाबत ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाशी संवाद साधला आहे.