जुन्नर तालुक्यात 4 हजार 410 विद्यार्थी उत्तीर्ण
जुन्नर – जुन्नर तालुक्यातील उच्च माध्यमिक परीक्षेचा (बारावी) निकाल 93.49 टक्के लागला असून, तालुक्याने उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या परीक्षेस विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील प्रविष्ट झालेल्या 4 हजार 722 विद्यार्थ्यांपैकी 4 हजार 410 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये 230 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, तर 926 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 2 हजार 441 द्वितीय श्रेणीत आणि 813 उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत, अशी माहिती जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वागदरे व गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांनी दिली.
तालुक्यातील महाविद्यालये व निकालाची टक्केवारी – शंकरराव बुट्टे कनिष्ठ महाविद्यालय, जुन्नर (93.52), श्री शिवछत्रपती महा विद्यालय, जुन्नर (92.12), ब्लुमिंगडेल कनिष्ठ महाविद्यालय, नारायणगाव (100), अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर (96.13), सद्गुरू महाविद्यालय, पिंपरी पेंढार (79.16), गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर, नारायणगाव (94.27), श्री बेल्हेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, बेल्हे (93.22), ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्यालय, आळे (96.29), सुभाष विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळवंडी (94.59), हिंदमाता महाविद्यालय, वडगाव कांदळी (80), पंडित नेहरू महाविद्यालय, निमगाव सावा (95.12), सावित्रीबाई फुले महाविद्यालय, ओतूर (92.30), विद्या विकास कनिष्ठ महाविद्यालय,
राजुरी (97.70), अंजुमन महाविद्यालय, जुन्नर (94.59), श्री रंगदास स्वामी महाविद्यालय, आणे (88.40), न्यू इंग्लिश स्कुल, आपटाळे (69.23), आणे माळशेज विद्या मंदिर, मढ (91.66), शासकीय आश्रमशाळा, सोमतवाडी (94.59), जे. आर. गुंजाळ महाविद्यालय, आळेफाटा (98.48), डॉ. कणसे महाविद्यालय, खानापूर (100), हांडे देशमुख महाविद्यालय, आळेफाटा (92.85), शासकीय महाविद्यालय, तळेरान (86.36), शासकीय आश्रमशाळा, कोळवाडी (100), समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, बांगरवाडी (95.26), विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालय, साकोरी (100), श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय, निमगाव सावा (95.55),
शासकीय आश्रमशाळा, खटकाळे (78.78), शासकीय आश्रमशाळा, सोनावळे (90.32), ज्ञानराज कनिष्ठ महाविद्यालय, आळे (100), जयहिंद महाविद्यालय, कुरण (95), निवृृत्तीशेठ शेरकर आयटीआय (100), समर्थ आयटीआय (92), अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय (व्होकेशनल), ओतूर (94.11), शिवछत्रपती महाविद्यालय (व्होकेशनल) (91.66), रा. प. सबनीस विद्यामंदिर (व्होकेशनल) (85.41), सुभाष विद्यामंदिर (व्होकेशनल), पिंपळवंडी (87.50).
टक्केवारी वाढली, गुणवत्ता घसरली…
गेल्या वर्षी तालुक्याचा निकाल 92.51 टक्के होता, यंदा त्यात वाढ होऊन 93.49 टक्के झाला आहे. गेल्यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा शाळेत आयोजित करण्यात आल्या, यंदा नेहमीप्रमाणे केंद्रांवर घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या (409) तुलनेत यंदा निम्मीच (230) झाल्याचे चित्र आहे.