Girish Mahajan : एकनाथ खडसे यांचा राजीनामा हा दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला नव्हता. तर पक्षात राहून त्यांनी चोऱ्या आणि आर्थिक घोटाळे केले होते, त्यामुळं त्यांना पक्षाने हाकलून दिले असे धक्कादायक वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले आहे.
गिरीश महाजन याची एकनाथ खडसेंवर आरोप करताना,”दाऊदच्या संभाषणामुळं आपल्याला पक्षातून काढलं असं एकनाथ खडसेंनी समजण्याची गरज नाही. एकनाथ खडसे ज्या फोटोवरुन आरोप करत आहेत ते दहा वर्षांपूर्वीचे कुंभमेळा प्रसंगी मुस्लिम धर्मगुरुंच्या घरी असलेल्या विवाह सोहळ्यातील फोटो असल्याचे महाजन म्हणाले. सध्या एकनाथ खडसे हे आता मानसिक तणावात असल्याचेही महाजन यांनी यावेळी म्हटले.
तसेच भोसरी भूखंड प्रकरण गौण खनिज उत्खनन प्रकरणात आलेल्या नोटीसमुळं एकनाथ खडसेंची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. काय बोलावं हे आता एकनाथ खडसेंना कळत नाही. त्यामुळं वाटेल ते बेछूट आरोप ते करत आहेत. एकनाथ खडसे यांच्या आरोपाला आम्ही किंमत देत नसल्याचे महाजन म्हणाले.
10 वर्षांपूर्वी कुंभमेळा प्रसंगी मुस्लिम धर्मगुरु यांच्या विवाह सोहळ्यात सर्व आमदार खासदार सर्व प्रतिष्ठित लोक उपस्थित होते. त्या लग्नात काही लोक आक्षेपार्ह होते असे आरोप होत आहेत. मात्र त्याबाबत आम्हाला कल्पना नाही. त्या विवाह सोहळ्यात आम्ही सर्व उपस्थित होतो, हे आम्ही मान्य करतो. हे यापूर्वीही याविषयी चर्चा झालेली आहे. त्यामुळं हा नवीन विषय नाही. वैफल्यग्रस्त परिस्थिती झाल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून अशा प्रकारे आरोप केले जात असल्याचे महाजन म्हणाले. एकनाथ खडसेंची परिस्थिती वैफल्यग्रस्त झाल्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत खडसे बडबड करत असतात असे महाजन म्हणाले.