Entertainment : बॉलिवूड सेलिब्रिटींसह त्यांची मुलं देखील कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान आणि करिश्मा कपूर यांच्या मुलांचे शाळेतील परफॉर्मसंचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरून बॉलिवूड सेलिब्रिटींची मुले कोणत्या शाळेत शिकतात, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याबाबतची आज थोडक्यात माहिती जाणून घेऊयात…
व्हायरल व्हिडिओमध्ये किंग खान शाहरुख खानचा अबराम खान, सैफ अली खानचा तैमुर, करण जोहरचे यश आणि रुही, आराध्या बच्चन तसेच शाहिद कपूरचे मिळआ आणि जैन कपूर या सेलिब्रेटी किड्सचा समावेश आहे. ते धीरुभाई अंबानी स्कूल मध्ये शिकतात. त्या शाळेच्या गॅदरिंगचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. त्याला अमिताभ बच्चन, शाहरुख खान, शाहिद कपूर, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन उपस्थित होते.
मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींची मुले शिकतात. धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल (DAIS) ची स्थापना 2003 मध्ये नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली झाली. अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींची मुले या शाळेत शिकतात. ही शाळा शैक्षणिक क्षेत्रात सतत नवीन मानके प्रस्थापित करत आहे आणि अवघ्या 20 वर्षांत जगातील सर्वोत्कृष्ट शाळांच्या लीगमध्ये पोहोचली आहे. या शाळेत लहान गट ते बारावी पर्यत शिक्षण दिले जात आहे. २००३ पासून नीता अंबानी त्या शाळेच्या फाउंडर आणि अध्यक्ष आहेत.
शाळेत काय आहेत सुविधा?
- या शाळेत एकूण 60 वर्ग असून त्यात ती पूर्णपणे डिजीटल आहे.
- प्रत्येक वर्गात डिस्प्ले आणि राइटिंग बोर्ड, इंटरनेट कनेक्शन, कस्टम मेड फर्निचर, मल्टीमीडिया सपोर्ट आणि एसी आहेत.
- शाळेमध्ये टेनिस आणि बास्केटबॉल कोर्ट तसेच मैदानी खेळांसाठी अनेक पर्याय आहेत.
- खेळाचे मैदान 2.3 एकरात पसरलेले आहे.
- आर्ट रूम, लर्निंग सेंटर, योगा रूम, सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, मल्टीमीडिया ऑडिटोरियम देखील आहे.
शाळेची फी किती आहे?
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एलकेजी ते सातवीपर्यंतची वार्षिक फी 1 लाख 70 हजार रुपये आहे. म्हणजेच महिन्याला 14,000 रुपये. इयत्ता 8 वी ते 10 वी साठी ICSE ची वार्षिक फी 1,85,000 रुपये आहे. इयत्ता 8 ते 10 साठी IGCSE साठी वार्षिक शुल्क 5.9 लाख रुपये आहे. IBDP बोर्डाची इयत्ता 11 आणि 12 वी साठी वार्षिक फी 9.65 लाख रुपये इतकी आहे.