मुंबई – राज्यासह मुंबईतील दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढत चालला आहे. तर दुसरीकडे 14 एप्रिलला काही लोकांनी गावी जायचे आहे असं म्हणत वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी केली होती ज्यामुळे बराच गोंधळ उडाला. याप्रकरणी विनय दुबे याला अटकही करण्यात आली. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. याच संदर्भात मराठी अभिनेते किरण माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून लिहिलेली फेसबुक भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहेत. उद्धवा… माझ्या राजा… बाळासाहेबांच्या बछड्या..तू लढ…आम्ही तुझ्या पाठीशी आहोत !!! असं कॅप्शन देत अनेकांनी या पोस्टला शेअर केले आहे.
किरण माने यांची फेसबुक पोस्ट