मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री गीता बसरा आणि भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह यांनी सोशल मीडियावर एक आनंदाची बातमी सर्वांशी शेअर केली आहे. गीता बसराने एक पोस्ट शेअर करत सांगितले की, ती पुन्हा एकदा आई होणार आहे.
View this post on Instagram
गीता बसराने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यासह पती हरभजन सिंह आणि त्यांची पाच वर्षाची मुलगी हिनाया दिसत आहे. गीताने फोटो शेअर करत पोस्ट केले की, ती आणि हरभजन दोघेही जुलै महिन्यात दुस-यांदा आई-बाबा होणार आहेत.
View this post on Instagram
या फोटोत गीताचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे. या फोटोंमध्ये हरभजन-गीता आणि हिनाया खूपच सुंदर दिसत आहे. तसेच अन्य फोटोंमध्ये हिनाया ही आपल्या आईच्या बेबी बंपचा किस करताना दिसत आहे. याशिवाय एका फोटोत हिनाया आपल्या हातात एक टी-शर्ट घेवून उभी असून या टी-शर्टवर “मी लवकरच मोठी बहिण होणार आहे’ असे लिहिलेले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, हरभजन सिंह आणि गीता हे 29 ऑक्टोबर 2015 रोजी विवाहबंधनात अडकले. यापूर्वी दोघांनी एकमेकांना दुर्घकाळ डेट केले होते. यानंतर 2015मध्ये त्यांना पहिली मुलगी हिनाया झाली होती.
View this post on Instagram