गौहर खान-झैद दरबारचे लग्न 25 डिसेंबरला

गौहर खान आणि झैद दरबार यांचा विवाह ठरल्याचे वृत्त गेल्या काही आठवड्यांपासून पासरायला लागले होते. आता या जोडीने त्यांच्या विवाहाची तारीख जाहीर करून टाकली आहे. त्यांचे लग्न 25 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे त्यांच्या विवाहाबद्दलच्या सर्व अटकळींना पूर्णविराम मिळाला आहे. गौहर खानने याबाबतची एक रंगीबेरंगी पोस्ट टाकून याबाबतची माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)


 अगदी निवडक नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये मुंबईतल्या आयटीसी मराठा हॉटेलमध्ये हा विवाह सोहळ होणार आहे. गौहर आणि झैदमधील रोमान्स अगदी काही महिन्यांपूर्वीचाच आहे. हे दोघे सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करताना दिसायला लागले होते. या दोघांच्या विवाहाचे सूतोवाच झैदचे वडील आणि संगीतकार इस्माईल दरबार यांनी सर्वप्रथम वर्तवले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

गौहर आणि झैद यांनी 5 नोव्हेंबर रोजी त्यांच्या लग्नाची निश्‍चिती झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर हे दोघेही दुबईला सुटी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. आता ते दुबईवरून परतले आहेत. या सुटीच्या काळात घालवलेल्या क्‍वालिटी टाईमचे मसत्‌ फोटो या दोघांनी इन्स्टाग्रामवर शेअर देखील केले होते. एका व्हिडीओमध्ये हे दोघे डान्स करता करता चक्क पडल्याचाही एक कॉमेडी व्हिडीओ आहे. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.