“मोतीचूर चकनाचूर’मुळे आथिया शेट्टी घाबरली

सुनिल शेट्टीची मुलगी आथिया शेट्टीने अलिकडेच ‘मोतीचूर चकनाचूर’चे शुटिंग पूर्ण केले. मात्र त्यानंतर तिच्या मनात एकप्रकारची भीती बसली आहे. या सिनेमाचा डायरेक्‍टर देवमित्र बिस्वाल आणि निर्माते वुडकेअर मुव्हीजमध्ये काही कारणामुळे वादावादी झाली आहे. त्यामुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे. बॉक्‍स ऑफिसवर सपशेल आपटलेल्या “मोतीचूर चकनाचूर’चा वाद आता कोर्टात जाऊन पोहोचला आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)


मात्र या वादविवादाचा परिणाम आथिया शेट्टीवर खूप खोलवर झाला आहे. स्वतःची काहीही चूक नसताना आथियाच्या पहिल्या सिनेमाचा “चकनाचूर….’ झाला आहे. त्यामुळे तिला आता तिच्या करिअरचीच चिंता वाटायला लागली आहे. स्वतः सुनील शेट्टीने एका इंटरव्ह्यूमधे ही गोष्ट सांगितली. आता कोणत्याही नवीन सिनेमाला स्वीकारण्यापूर्वी आथिया सर्वच पर्याय खूप काळजीपूर्वक तपासते आहे. 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

अर्थात हा पॅच कधी तरी एखाद्या कलाकाराच्या करिअरमध्ये येतोच. याची आथियाला सवय व्हायला हवी. “मोतीचूर…’मुळे तिचे एकटीचे नुकसान झालेले नाही. कारण तिच्याशिवाय या सिनेमामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी देखील आहे. आता तिच्या हातात नवीन सिनेमा आल्यावर कदाचित ती थोडी सावरलेली असेल. पण तोपर्यंत ती धास्तावलेलीच आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.