केतकावळे -पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाची जलवाहिनी समजले जाणारे गराडे धरण सलग चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे 100 टक्के भरले आहे. त्यामुळे सासवड शहर व हिवरे, बोपगाव, कोडीत आणि गराडे आदी गावांतील पाणीप्रश्न सुटला आहे.
गराडे धरणातील पाण्याचे पूजन आमदार संजय जगताप यांनी केले. याप्रसंगी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपाध्यक्ष निर्मला जगताप, विजयराव वढणे, मनोहर जगताप, अजित जगताप, पुष्पा जगताप, मंगल म्हेत्रे, विश्वजित आनंदे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रामानंद कळसकर, जलसंपदा विभागाचे पुरंदर उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभागीय अधिकारी बी. एस. बेंद्रे आदी उपस्थित होते.