पाकिस्तानातून स्थलांतरीत झालेल्या कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू

जयपुर – पाकिस्तानातून भारतात स्थलांतरीत झालेल्या हिंदु कुटुंबातील 11 जण राजस्थानातील आपल्या निवासस्थानी मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले आहे. या सर्वांनी विष प्राशन करून सामुहिक आत्महत्या केली असावी असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. 

जोधपुर जिल्ह्यातील लोडता गावात हे कुटुंब एका झोपडीत राहात होते. जिल्हा पोलिस अधिक्षक राहुल बरहात यांनी सांगितले की, या मृत्यूंच्या नेमक्‍या कारणाचा आम्ही शोध घेत आहोत पण त्यांच्या झोपडीच्या परिसरात एका रसायनाचा विचित्र वास येत आहे. त्यावरून त्यांनी विष प्राशन करून सामुहिक हत्या केली असावी असा आमचा अंदाज आहे.

हे सर्व जण भिल जमातीचे होते. व ते मुळचे पाकिस्तानी हिंदु कुटुंब आहे. ते भारतात स्थलांतरीत झाले होते. हे कुटुंब त्यात गावात भाड्याने शेती घेऊन त्यावर गुजराण करीत होते. त्यांच्या कुटुंबातील एक जण जीवंत सापडला आहे. त्याच्याकडून या घटनेविषयी माहिती मिळू शकेल. पण तो अजून शुद्धीत आलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.